आहेर पद्धती
10 मे 2002 रोजी स्त्री रंग या लोकसत्ता ' च्या पुरवणीमध्ये हा माझा लेख आला होता . या लेखाचं शीर्षक आहे , “ आहेर पद्धती ”. ***** राधिका भा वा कडून परत आली , ती त्याच्याबद्दल कडवटपणा मनात घेऊन च. तिची सतत धुसफूस सुरू होती . तिच्या भावाकडे मुलाचे लग्न होते . राधिका च्या भावाचे घर तिच्यात गावात होते . नेहमीच तिचे त्याच्याकडे जाणे येणे होत होते . तिला तिच्या भावाबद्दल , वहिनी बद्दल काही तक्रार करण्याचं कारणच नव्हतं मग आताच काय बिघडाव ? गेल्या पंधरा दिवसांपासून ती भावाकडे लग्नाच्या तयारी करता जाऊन राहिली होती . पण लग्नानंतर मात्र काही तास ही राहिली नाही . का ? का ? इतके वर्षांचे बहीण-भावांचे संबंध असे सहज तुटणार होते ?भा वाकडे पहिले आणि शेवटचे लग्न होते म्हणून राधिका ने वहिनी करता नेकलेस घेतला, भावाला सूट शि वला आणि मुलालाही असच बेस्ट गिफ्ट निवडलं.वाहिनीनेही ती ला पैठणी नेस वली.राधिकेच्या म्हणण्या प्रमाणे तिने गिफ्ट मध्ये जास्त पैसा घालवला पण त्याच्या मानाने भावाने काहीच परत केलं नाही .भावाकाडचा आहेर दाखवायची जागाच राहिली नाही , आता तिला कु...