आहेर पद्धती

10मे2002 रोजी स्त्री रंग या लोकसत्ता'च्या पुरवणीमध्ये हा माझा लेख आला होता .या लेखाचं शीर्षक आहे, आहेर पद्धती”.

*****

 
राधिका भावा कडून परत आली, ती त्याच्याबद्दल कडवटपणा मनात घेऊनच. तिची सतत धुसफूस  सुरू होती. तिच्या भावाकडे मुलाचे लग्न होते .राधिका च्या भावाचे घर तिच्यात गावात होते. नेहमीच तिचे त्याच्याकडे जाणे येणे होत होते. तिला तिच्या भावाबद्दल, वहिनी बद्दल काही तक्रार करण्याचं कारणच नव्हतं मग आताच काय बिघडाव ?गेल्या पंधरा दिवसांपासून ती भावाकडे लग्नाच्या तयारी करता जाऊन राहिली होती. पण लग्नानंतर मात्र काही तास ही राहिली नाही. का? का?

इतके  वर्षांचे बहीण-भावांचे संबंध असे सहज तुटणार होते ?भावाकडे पहिले आणि शेवटचे लग्न होते म्हणून राधिकाने वहिनी करता नेकलेस घेतला, भावाला सूट शिवला आणि मुलालाही असच बेस्ट गिफ्ट निवडलं.वाहिनीनेही तीला पैठणी नेसवली.राधिकेच्या  म्हणण्या प्रमाणे तिने गिफ्ट मध्ये जास्त पैसा घालवला पण त्याच्या मानाने  भावाने काहीच परत केलं नाही.भावाकाडचा आहेर दाखवायची जागाच राहिली नाही, आता तिला कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नाही.भावाकाडचा आहेर दाखवायची देखील मला लाज वाटते अशी भावना तिच्या मनात घर करून होती .

खरच का एवढा प्रतिष्ठेचा हा प्रश्न होता ?भावानी एवढा मोठा आहेर मागितला होता का? आणि त्याला फक्त एकट्या बहिणीला आहेर परत करायचा होता का? भावाची हे सर्व करण्याची ऐपत  होती का? या सर्व प्रश्नांचा विचार करण्याइतकी  राधिका शिकलेली होती नक्कीच , पण फक्त अपेक्षा जरा जास्त करत होती. मी केला तेवढाच मला परत मिळायला हव हि  तिची धारणा होती.

                                             दीक्षा ची पद्धत  तर याहून निराळी होती.तिला  कोणाकडचाहि आहेर  पसंत पडतच नाही .कधी आलेली साडी मोलकरणीला देण्यासारखीच असते, तर कधी बोहारणीला देण्यासारखी असते, कधी मिळालेले कापड  कापड फरशीपुसणं असतं, पण देणाऱ्याच्या भावना कधी तिच्या लक्षातच येत नाही.मात्र स्वतःइकडचं आलेला तिकडे केलं तरी तो घसघशीत आहे असतो. तर कधी सेलमधून साड्यांची खरेदी करून ठेवलेली असते .चार आठ महिन्यानंतर च्या कार्यात आहे म्हणून त्या साड्या वापरायच्या असतात.मग त्या  खराब झाल्यातरी  त्याची तिला पर्वा नसते.अजून काही नमुने असे असतात कि आहेर मिळता क्षणी लगेच नाकतोंड तत्क्षणीच मुरडले  जाते. या गोष्टीचा देणाऱ्या वर काय परिणाम होईल याचा जरासाही विचार त्यांच्या मनाला शिवत नाही. कोणी दिलेल्या आहेरावर खुश  होणारी किंवा आनंद मानणारी व्यक्ती विरळाच. अशा व्यक्ती बोटावर मोजण्याइतक्याच  निघतील.मग असा अटीतटीचा,मानापमानाचा, प्रसंग टाळता आला तर?ज्यांनी  वर्षानुवर्षे असलेल सुंदर नातच तुटून जात असा हा प्रसंग आयुष्यात हवाच कशाला ?असं ठरवून तो प्रसंग आयुष्यात येऊ नये असंच ठरवलं तर?असे कटू  प्रसंग आयुष्यातून काढून टाकायला पाहिजेत .

                             त्या दृष्टीने  कधी कोणी प्रयत्न केला असेल का? असे प्रयत्न बरेच वेळा झाले असतील पण असे प्रयत्न करणाऱ्यांना अपमानित व्हावं लागलं असेल अन परत ते आहेर पद्धतीत अवश्य अडकले  असतील,अहो म्हणून तर हि आहेर  पद्धती बंद होता सर्वांच्या  मानगुटीवर बसली आहे ना. आहेर देआणि घेण याचाच विचार  सुरू होतो. हे द्यावं कि ते द्यावं ? लोकांना आवडेल की नाही,आपल्या status ला शोभेल की नाही या विषयावर सतरावेळा  चर्चा होते आणि मग सगळ्यांना एक सारख्या वस्तू देता वेगवेगळे वर्गीकरण निश्चित केल्या जाते.त्यातही साड्यांच्या कॅटेगरीत मावशी, मामी, आत्या, काकू यांच्या वेगळ्या.कारण त्यांचा मान विशेष आणि त्यांच्या सुनांना  हलक्या, बाकीच्यांना ताट,वाटे,आणि काय काय. अर्धा वेळ पैसा या कारणासाठीच वाया घातला जातो आणि तरीदेखील त्यातून मानपान ,रुसणं ,फुगणं येतच .मग या खर्चाचं प्रयोजन काय?का करावा असा खर्च,पैशाचा अन वेळेचा अपव्यय . व्यक्ती कितीही सुशिक्षित असो वा अशिक्षित असो गरीब असो वा श्रीमंत असो आलेल्या आहेरा बद्दल चर्चाही घरोघरी होत असते. आहेर देणे आणि घेणे हा चर्चेचा विषय प्रत्येक घरात असतोच. आहे देणं किंवा करण बरेच ठिकाणी कर्तव्यपूर्तीच्या भाग म्हणून असतो.अश्या ठिकाणच्या आहेरासाठी बायका शहरातले असले नसले सर्व सेल पालथी घालत असतील आणि त्यातल्या त्यात स्वस्त ,सुंदर , टिकाऊ  वस्तू शोधत असतील.खरेदी, देणे , घेणे ,आणि आवडला नाही म्हणून रुसणे , फुगणे , हा सर्व मक्ता स्त्रियांकडेच जणू दिलेला आहे म्हणून तर त्याच सतत हे उपद्व्याप करीत असतात म्हणून आहेर  पद्धती जर बंद करायची  असेल तर त्यासाठी फक्त स्त्रियाच प्रयत्न करू शकतात .फक्त  लग्नाच्या सीझनमध्ये नव्हे तर रक्षाबंधन ,दिवाळी,भाऊबीज अशा प्रसंगाला भाऊ बहिणीच्या नात्याला विशेष महत्त्व न देता यालाच महत्त्व दिले जाते.नात्याला किंमत  लावली जाते.

रूपाला तर या दोन सणांचा भारीच राग आहे .ती दिवाळीच्या दिवसात बाजारात भेटली सहजच दिवाळीच्या खरेदी संबंधित बोलणं निघालं तर म्हणाली, आता कुठे देण्याची खरेदी झाली. 5000 असेच संपवले आता आमच्यासाठी काय करणार ? मग आमच्याच बाबतीत  काटकसर होणार! अग मग  कशासाठी तू हे करतेस”? असं मी तिला म्हणाले.अग ते लो करताना आम्हा सर्वांना.मग  त्यांना नको का घ्यायला काही ?  नं घेणा बरं थोडीच दिसत .”इति रूपा .बर दिसत नाही म्हणून रूपाली खरेदी करणार होती.इतरांच्या निरर्थक  भावना जपण्यासाठी स्वतः अडचणीत पडणार होती .दुसर्यांना खुश करण्यासाठी स्वतःचा  दिवाळीचा आनंद घालवून  बसणार होती .खरं म्हणजे आपली क्षमता लक्षात न घेता आपल्यापैकी बरेच जण स्वतःवर अशा पद्धतीने अन्यायच करीत  असतात

. रेखाताई, तुम्ही नेसल्या नाही हो आम्ही दिलेली साडी”? रिता, तू तरी कुठे नेसलीस? दरवर्षी दिलेली साडी भावजयीने नेसली तर नणंद तिने दिलेली साडी नेसणार त्यातही  मग पुढच्या काही महिने साडी जरा  कमीच आहे  (यांचा घेर वाढतो आहे हे लक्षात न घेता ) अस म्हणत राहतील .रंग , पोत जरा खराबच आहे , हे असं काही महिने झाला कि मग  काही दिवसात रक्षाबंधन येतो, मग काही महिने ते सुरू राहिला की लगेच दिवाळी येते यांच्या जोडीला लग्न,च  मौंजी असतातच  म्हणजे वर्षभर मानपान करण्यात , बघण्यात जातो.

                         गरज असेल तेव्हा मदतीच्या बाबतीत कानाडोळा केला जातो.त्यापेक्षा खरेच प्रत्येकाने जर आहेर देणं, घेणं सुद्धा बंद केलं तर पैसा आणि वेळेचा अपव्यय  नक्कीच थांबेल.मुख्य म्हणजे प्रत्येक कार्य प्रसंग बिनतक्रार उत्साहाने पार पडतील.कार्यात  उपस्थित राहताना अडचण वाटणार नाही.तर मग करा  सुरुवात आहे पद्धती बंद करण्याची.अर्थातच त्या अनुषंगाने मने खराब नं होता जुळून येतील. आजच्या परिस्थितीमध्ये थोडाफार बदल झाला.पण  माणसं रुसवा-फुगवाहे बदललेले  दिसत नाहीये हा विचार करायला हवा. सदर पद्धतच  बंद व्हायला हवी .सध्या करोना च्या  काळात या सगळ्या गोष्टींना बंधन आली  आहेतच. नव्याने जीवन सुरू झाल्यावर आहेर पद्धत नसेल तर तोच खरं बदल असेल.

 धन्यवाद!

 


Comments

  1. छान लिहिले, खरंच ही पद्धत बंद व्हायला हवी त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल.
    अपेक्षा नसल्यामुळे संबंध ही गोड राहतील.. अभिनंदन💐💐💐

    ReplyDelete
  2. आता ही पद्धत बंद होण्याच्या वाटचालीत आहे.छान लेख,

    ReplyDelete
  3. Paddhat band vhayla pahije pan, paddhat band kara mhananarech tyala khat pani ghaltat n dusaryanna nav thevnyat pudhe asatat

    ReplyDelete
  4. Atishay smarpak mandani kelit
    tumhi vishayachi....agdi patala ...tumhi sangitalyapramane Jo Aaher paddhati banda karnyacha prayatna karto tyalach tikela samora jawa lagata hehi titkach khara aahe...jashya Baal vivah , Sati chi chaal aani ashya asahya ritinna bandhane ghalnyat aalit tyapramae hi paddhat suddha Banda Karne aarthik , samajik aani manasik drushtya atishay aawashyak
    Watata mala tari ...hyane yajamanala sarvatopari yenara taan nahisa houn kaaryakramacha aananda sarwannach sarkha gheta yeil...naahitar var-vadhuche mata-pita dekhil aaplya mulanche aanandache Kahan baghnyache sodun Aaher dene dene ghene hyatach guntun rahataat....
    Asach lihit raha.... chhan lihilat aapan...Anek Shubhechha...!!!!💐👏👏👏🙏💖

    ReplyDelete
  5. छान लिहिलेस गं .... मला विविध अनुभव आहेत ह्या बाबतीत.... 😁😁

    ReplyDelete

Post a Comment